अन्नछत्र
अन्नदान सर्व श्रेष्ठ दान... असे म्हटले जाते.
संत एकनाथांच्या वाड्यात अन्नदान अखंड चालूच असे, येणारा अतिथी तृप्त होऊनच परतत असे. हाच वारसा पुढे नेण्याच्या हेतूने अन्नछत्राची स्थापना करण्यात आली. संस्थांच्या मार्फत अन्नछत्राचे कामकाज सांभाळले जाते. येथे भोजनाचे येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही. येथील आचारी व इतर कर्मचार्यांना नाममात्र मानधन दिले जाते. स्वयंसेवक म्हणूनही बरीच लोकं येथे सेवा देतात.
अन्नछत्रांचा उपयोग विद्यार्थी, वारकरी, गोरगरीब, संन्यासी, साधू, यात्रेकरू, निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत आला आहे. दर्शनास्तव येणाऱ्या परगांवच्या नाथ भक्तांना भोजन व्यवस्था हेही यामागचे एक कारण. सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १२०० च्या वर व्यक्ती भोजनाचा लाभ घेतात. अन्नछत्र गृहात एका वेळेस १५० व्यक्ती लाभ घेतील अशी बैठक व्यवस्था केली आहे.