भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- 36211720207 आय. एफ. एस. सी.:- SBIN0003796(स्टेट बँक ऑफ इंडिया) अंतर्गत आयकरात वजावट - Tech/80G/294/2017-18/6919

॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥

पैठण पर्यंटन स्थळ

पैठण म्हटलं, की 'नाथांचं पैठण'. अशीच आज पैठणची ओळखा नि नावांचे या पैठणशी जडलेलं अतूट नातं। पैठणला वैभवाचा, पराक्रमाचा, गौरवशाली इतिहास आहे. पूर्वीची ही प्रतिष्ठान'नगरी. गोदाकाठी वसलेली इंद्रायणी जशी महाराष्ट्राची सरस्वती, तशी गोदावरीही दक्षिण सरस्वतीच, जी तेहतीस तीर्थांनी व्यापलेली आहे . 'दक्षिणगंगा' म्हणून पावन ठरलेली गोदामाता तर हिचं वैभव आहे. दक्षिण काशी' म्हणून मानल्या गेलेल्या या नगरीला इ. स. पूर्व सहाव्या शतकापासूनचा इतिहास आहे. शककर्त्या शालिवाहनांच्या काळात हिनं सुवर्णनगरीचं ऐश्वर्य उपभोगलं 'काश' म्हणजे 'प्रकाशणं... धनसंपत्ती, धर्म, ज्ञान-विद्या, निसर्गसौदर्य यांचा अविरत प्रकाश देणारी नगरी ती 'प्रतिष्ठाननगरी'.

उत्तर चालुक्य कालखंडाची साक्ष देणारी भगवान 'नृसिंह' अन् 'कालभैरवाची मूर्ती येथे आहे. संत ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञानाचा पहिला पाठ पैठणला येऊनच घेतला. शुद्धिपत्रप्राप्तीसाठी रेड्यामुखी वेद वदवून, तेथील 'नागघाट' स्पंदित केला. त्यांचं जन्मस्थळ आपेगावही नजीकच.

पैठणची पैठणी जगविख्यात ठरली आहे. भारतातील सर्वात महाग आणि प्रसिद्ध साड्यापैकी पैठण एक आहे. अत्यंत उत्तम अश्या रेशीम, जर आणि सुवर्ण, चांदीच्या तारांनी पैठणी तयार केली जाते.


गावातील नाथमंदिर

हे श्री एकनाथमहाराजांचे राहते घर होते. येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. जी कर्नाटकातील एका सावकाराने नाथांना भेट म्हणून दिली होती. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत. तसेच एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत.

येथील पुराणखांबाला टेकून संत एकनाथ प्रवचन करीत. श्रीखंड्‍याने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण येथे आहे. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. मंदिर परिसरात नाथवंशीयांची घरे आहेत.


समाधी मंदिर

हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे. नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तुळस आणि पिंपळाची रोपं उगवली असे म्हटले जाते. तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडीत यांनी नाथांच्या पादुका स्थापित केल्या. एकनाथांचे ११ वे वंशज श्री भानुदास महाराज गोसावी यांनी मंदिराचा लाकडी गाभारा बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे.

नाथंच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या असून डाव्या बाजूस वंशजांच्या समाध्या आहेत. नाथांच्या समाधीच्या मागे प्रदक्षिणा मार्गावर नाथशिष्य उद्धव यांची समाधी आहे तर उत्तर दरवाज्याजवळ दुसरे शिष्य गावोबा यांची समाधी आहे. दर एकादशीस येथे वारी भरते त्याहीवेळी हजारो वारकरी नाथसमाधीचं दर्शन घेतात. दर वर्षी एकनाथषष्ठीचा महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी वारकरी लाखोंच्या संख्येनं हजेरी लावतात.


जायकवाडी धरण

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून जायकवाडी प्रकल्प हा एक सिंचन प्रकल्प आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी या धरणाची प्रचीती आहे. धरणाच्या जलाशयाला ‘नाथसागर’ नाव दिले आहे. पाणीसाठ्याचे क्षेत्रफळ ३५० वर्ग कि.मी आहे व एकूण क्षमता २९०९ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या रहिवासी व औद्योगिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच तब्बल 400 गावांची तहान जायकवाडी धरण भागवतं. येथे जलविद्युत केंद्र असून त्याची क्षमता १२ मेगावॉट इतकी आहे.

जायकवाडी धरणास एकूण २७ दरवाजे आहेत. १५ ऑगस्ट २०११ मध्ये विसर्ग सुमारे ३ लाख क्यूसेक्स पेक्षा जास्त करण्यात आल्या मुळे निम्मे पैठण शहर पाण्यात होते. या दिवसाची पाणी पातळी संत एकनाथ समाधी मंदिरात पाहू शकतो.

नाथसागर परिसर हे एक पक्षी अभयारण्य आहे. हे ‘जायकवाडी पक्षी अभयारण्य’ नावाने ओळखले जाते. हे पक्षी अभयारण्य पक्षीनिरीक्षकांचे नंदनवन आहे कारण अभयारण्यात अनेक रहिवासी आणि स्थलांतरित पक्षी आढळू शकतात. पक्षी अभयारण्य अनेक फोटोग्राफर देखील आकर्षित करते. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत पक्ष्यांच्या अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.


संत ज्ञानेश्वर उद्यान

संत ज्ञानेश्वर उद्यान म्हैसूर मधील वृंदावन गार्डनच्या धरतीवर बनवलेले आहे. नाथसागर शेजारी १९७० साली राज्य शासनाने हे उद्यान बांधले. एकूण १२५ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे २८ हेक्टर क्षेत्र उद्यान आहे. उर्वरित क्षेत्र विविध प्रकारची फळ झाडे आहेत. संगीत कारंजे हे संत ज्ञानेश्वर उद्यानाचे मुख्य आकर्षण आहे. उद्यान परिसरातच एक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहे, दरवर्षी भरपूर पर्यटक, शैक्षणिक सहली उद्यानाला भेट देतात.


तीर्थखांब

पैठणच्या वैभवात तिथला 'विजयी स्तंभ-तीर्थखांब लक्षणीय आहे. प्रतिष्ठाननगरीच्या गत-ऐश्वर्याचा तो एक महनीय साक्षीदार आहे. शककर्त्या सम्राटानं दक्षिण हिंदुस्थानावर प्राप्त केलेल्या विजयाची साक्ष म्हणून, या विजयाचं एक प्रतीक या नात्यानं, सम्राट शालिवाहनाच्या ४६० वर्षे राजधानी म्हणून वैभवात राहिलेल्या या नगरीत एक अजोड, अप्रतिम शिल्पकृती म्हणून तेव्हापासून आजवर हा तीर्थखांब तिथं येणाऱ्या रसिकांच्या स्वागतासाठी उभा आहे.


नागघाट

नागघाट हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. जवळच शासकीय उत्खनन क्षेत्र आहे, जिथे पुष्कळ पुरातन वस्तू व कलाकृती उत्खनन करून सापडलेल्या आहेत.


सातबंगला पैठणी साडी केंद्र

भारतातील प्रसिद्ध साड्यापैकी एक पैठणी साडी येथे परंपरागत पद्धतीने बनवली जाते.