भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- 36211720207 आय. एफ. एस. सी.:- SBIN0003796(स्टेट बँक ऑफ इंडिया) अंतर्गत आयकरात वजावट - Tech/80G/294/2017-18/6919

॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥

मंदिराचे सदस्य

मा. नामदार संदीपन पा. भुमरे

अध्यक्ष
तथा रो. हि. यो. मंत्री महाराष्ट्र राज्य

पैठण नगरी सारख्या महान संतांच्या भूमीत संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्थ मंडळाचा विश्वस्थ म्हणून सेवा करण्याचे भाग्य मला लाभले तसेच या संस्थानाचे अध्यक्षपदही मला मिळाले.

संताचिये पायी हा माझा विश्वास ।
सर्वभावे दास झालो त्यांचा ।।

हे अध्यक्षपद म्हणजे मी केलेल्या कार्याला लाभलेली सोनेरी झालरच म्हणावी लागेल. अध्यक्ष या नात्याने मंदिराची सेवा करण्याचे भगिरथ कार्य मला लाभले. मंदिराचा विकास, भक्तनिवास, भजन, कीर्तन महोत्सवाकरीता सभागृह, व्यापारी संकुल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि शासनाच्या मदतीने पूर्ण झाला. संस्थानतर्फे सुरू केलेल्या विविध उपक्रमास भाविकांनी आत्तापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी संस्थानतर्फे आपला सर्वांचा ऋणी आहे

अनंत बा. गव्हाणे

विश्वस्त
तथा अप्पर जिल्हा अधिकारी, औरंगाबाद

बाजीराव केशवराव बारे

कार्यकारी विश्वस्त

श्रीक्षेत्र पैठण म्हटले, की 'नाथांचे पैठण' ही ओळख सर्वत्र आहे. संत एकनाथांचे कार्य हे अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. सनातनी परंपरा झुगारून समतेचा संदेश देणाऱ्या संत एकनाथांचे जीवन व कार्य सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे आहे.

एकनाथांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली. संस्कृतातील ज्ञान मराठीत यावे यासाठी प्रयत्न केले. संस्कृत भाषेऐवजी मराठी भाषेचा सहेतुक आग्रह धरला.

संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचा कार्यकारी विश्वस्त होण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल मी आभार मानतो.

ह.भ.प. विठ्ठल म. चनघटे

विश्वस्त तथा प्रतिनिधी
अ.भा.वा. मंडळ महाराष्ट्र

श्री संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली तसेच फार मोठा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेली प्रतिष्ठाननगरी म्हणजेच आजचे पैठण शहर, अनेक संतांनी या पैठणनगरीचे धार्मिक माहात्म्य आपल्या वाङ्मयाद्वारे सांगितले आहे.

आपण काळजीपूर्वक अभ्यास केल्यास एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे आपल्या शब्दसामर्थ्याद्वारे समाज सुधारण्याचे महान कार्य श्री संत एकनाथ महाराजांनी केलेले आहे. एकनाथ महाराजांचे जीवनकार्य व त्यांचे चरित्र अतिशय विस्तृत आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील पाणी कधीही संपत नाही, त्याप्रमाणे श्रीनाथ महाराजांचे वर्णन संपणे अशक्य आहे.

प्रा.डॉ. गणेश आसाराम मोहिते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
औरंगाबाद प्रतिनिधी

पैठणनगरीचा प्राचीन इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे. दोन हजार वर्षांपूर्वी शककर्ता शालिवाहन राजाची ही राजधानी शालिवाहन घराण्याचा इतिहास व पराक्रम सर्वज्ञात आहे. तीर्थखांबाच्या रूपाने तो सदैव आपल्या स्मृती जाग्या ठेवतो.

गोदावरी या दक्षिणगंगेच्या काठी वसलेल्या या शहराला भारतभूमीत 'दक्षिण काशी' असेही संबोधतात. राजसत्ता, धर्मसत्तेचे केंद्र म्हणून भारतभर पैठणचा नावलौकिक होता. राजसतेच्या आश्रयाने अनेक कलावंत, धर्म पंडित या ठिकाणी आश्रयाला आले आणि आमची प्राचीन प्रतिष्ठाननगरी साहित्य, संस्कृती, कला, व्यापार-उदीम यांचे माहेरघर बनली. पैठणचा युरोपातील अनेक देशांत व्यापार चालायचा. त्याचे संदर्भ आपणांस इतिहासात आढळतात. त्याचप्रमाणे वेरूळच्या लेणी निर्मितीत पैठणच्या पाचशे कलाकारांचा सहभाग होता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेरूळच्या लेणीचा स्थापत्य शिल्पकार कोकस होय. त्यासह 'पैठणी' साडीने पैठणचे नाव जगात अजरामर केले आहे.

रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी

विश्वस्त राघोबा शाखा, पैठण

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ती सुवर्ण पाने चाळत असताना आपल्याला असे दिसून येईल, की महाराष्ट्राची एकेकाळची राजधानी ही पैठण होती. सम्राट सातवाहनाच्या काळात याचा उच्चार 'प्रतिष्ठान' असा केला गेला. या प्रतिष्ठानची प्रतिष्ठा भारतवर्षात निनादली ती, शूरवीर राजे व या पवित्र क्षेत्री जन्मलेल्या संत एकनाथ महाराजांमुळेच.

संत ज्ञानेश्वर-नामदेव यांच्या काळात वारकरी वाङ्मयात नऊ रसांचाच प्रामुख्याने परिपोष झालेला दिसतो पण नाथांनी अनेक नव्या रसांचा उपयोग केला आणि वाङमयाला लोक्रांजाक्तेचा नाव पैलू बहाल केला.