+(02431) - 223602
श्री संत एकनाथांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या प्रतिष्ठाननगरी म्हणजेच पैठण शहर येथे श्री संत एकनाथ महाराजाचे समाधी मंदिर (बाहेरील नाथ मंदिर) व एकनाथ महाराजांचे राहते घर तसेच देवघर (गावातील नाथ मंदिर) आहे.
पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. शिवाय दर एकादशीस येथे हजारो वारकरी नाथसमाधीचं दर्शन घेतात. मंदिरात वीणेचा अखंड पहारा असतो.